राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांना आर्थिक मदत देते. मात्र, अनेक महिलांनी जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, असे सोशल मीडियावर चर्चिले जात आहे. काही महिलांना योजना अपात्र ठरवले गेले आहे. त्यामुळे पुढील हप्तेही मिळणार नाहीत. हप्ता न मिळण्याची कारणे, पात्रतेचे निकष आणि अपात्र ठरणाऱ्या गटांची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
जानेवारीचा हप्ता का मिळाला नाही?
अनेक महिलांना यापूर्वीच्या सर्व हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. मात्र, जानेवारी महिन्यात काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. याला अनेक कारणे असू शकतात. काही महिला नव्याने अपात्र ठरल्या आहेत. शासनाने आता पात्रता तपासण्याची प्रक्रिया अधिक कठोर केली आहे. त्यामुळे काही लाभार्थिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे.
योजनेसाठी पात्रतेचे महत्त्वाचे निकष
सरकारने योजनेसाठी काही महत्त्वाचे निकष ठरवले आहेत. या निकषांवर पात्रता ठरते. जर तुम्ही खालील पात्रता निकष पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाभ मिळेल.
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या किंवा निराधार महिला यांना या योजनेचा लाभ मिळतो.
कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
महिलेचे वय किमान २१ वर्षे पूर्ण आणि कमाल ६५ वर्षांपर्यंत असावे.
लाभार्थी महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असले पाहिजे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
जर या सर्व पात्रता निकषांची पूर्तता होत असेल तरच महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता असते.
जानेवारी हप्ता न मिळण्याची कारणे
काही महिलांना योजनेचा हप्ता मिळाला नाही. यामागे काही कारणे असू शकतात.
वयोमर्यादा ओलांडली असेल:
– जर तुमचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त झाले असेल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र ठरता.
– काही महिलांनी आधार कार्ड अपडेट करून हप्ता घेतला होता. मात्र, आता याची पुन्हा तपासणी होत आहे.
लाभार्थीचे नाव योग्य नसेल:
– लाभार्थी महिलेचे नाव आधार कार्डमध्ये आणि अपलोड केलेल्या दस्तऐवजांमध्ये एकसारखे असणे गरजेचे आहे.
– जर आधार कार्ड व दस्तऐवजांमध्ये तफावत असेल तर हप्ता थांबवला जातो.
कुटुंबाचे उत्पन्न जास्त असेल:
– जर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता.
– याकरिता शासन आता कुटुंबातील सदस्यांकडून भरला जाणारा आयकर (Income Tax) तपासत आहे.
सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन मिळत असल्यास:
– जर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा निवृत्तीवेतन (Pension) घेत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही.
– राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा स्थानिक सरकारी संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचारी यांच्या पत्नी किंवा कुटुंबातील महिलांना लाभ नाकारला जाईल.
इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास:
– जर तुम्ही पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना यांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास:
– जर तुमच्या नावावर चारचाकी वाहन असेल (ट्रॅक्टर सोडून) तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
– शासन अशा लाभार्थ्यांची तपासणी करून हप्ता थांबवत आहे.
आमदार किंवा खासदार कुटुंबातील सदस्य असल्यास:
– जर कुटुंबातील कोणी विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार असेल तर तुम्ही अपात्र ठरता.
हप्ता मिळत नसेल तर काय करावे?
जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे.
तपासा की तुमचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त झाले आहे का?
तुमच्या कुटुंबातील कोणी आयकर भरतो का?
तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक आहे का?
तुमचे आधार कार्ड योग्यरीत्या लिंक आहे का?
तुमच्या नावावर चारचाकी वाहन आहे का?
जर तुम्ही पात्र असाल आणि तरीही हप्ता मिळत नसेल, तर जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालय येथे संपर्क साधू शकता.